District Court Cut-Off Marks 2024 | जिल्हा न्यायालयाच्या लिपिक शिपाई हमाल कट-ऑफ मार्क्स 2024:

District Court Cut-Off Marks 2024

Table of Content hide
I. Details Of District Court Cut-Off Marks 2024

Details Of District Court Cut-Off Marks 2024

District Court Cut-Off Marks 2024: After successful commencement of District Court Recruitment Court Clerk Constable Hamal Cut-off Screening Test (if conducted) District Court will soon publish on its official website. After all the stages of selection are completed, District Court Clerk Sepoy Hamal Cut-off for various categories will be released. Candidates will be selected for the post of District Court Clerk Shipai Hamal on the basis of performance in Screening Test (if conducted), Marathi Typing Test, English Typing, and Interview. for more information about District Court Cut-Off Marks 2024 visit our website www.yuwabharti.com

जिल्हा न्यायालय भरती न्यायालयाच्या लिपिक शिपाई हमाल कट-ऑफ चाळणी चाचणी यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर (आयोजित केल्यास) जिल्हा न्यायालय लवकरच त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करेल. निवडीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर, जिल्हा न्यायालयाचे लिपिक शिपाई हमाल कट-ऑफ विविध श्रेणींसाठी प्रसिद्ध केले जाईल. स्क्रिनिंग टेस्ट (आयोजित केल्यास), मराठी टंकलेखन (Typing Test), इंग्रजी टंकलेखन (English Typing ), आणि मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर जिल्हा न्यायालयाच्या लिपिक शिपाई हमालच्या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

लेखी परीक्षेत किमान पात्रता गुण मिळवण्यासाठी उमेदवारांना सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह जिल्हा न्यायालय बुक्समधून अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो.
जिल्हा न्यायालय कटऑफ 2023 रिक्त पदांची उपलब्धता, परीक्षेला बसलेल्या एकूण उमेदवारांची संख्या, अडचणीची पातळी, किमान गुण इत्यादी विविध घटकांवर आधारित आहे.

www.yuwabharti.com

District Court Clerk, Peon, Stenogrepher Recruitment Overview

महाराष्ट्रातील एकूण 32 जिल्हा न्यायालय व मुंबईतील तीन न्यायालय यामध्ये लघुलेखक (स्टेनोग्राफर) कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लर्क ) शिपाई /हमाल (Peon ) एकूण 5793 पदांच्या जिल्हा न्यायालय भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा न्यायालय भरती (jilha Nyayalaya bharti ) Exam 5,8,10 ,12 आणि 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान झाली होती.

एकूण जागा = 5793

कनिष्ठ लिपिक = 3495 जागा
शिपाई हमाल = 1585 जागा

सर्व जिल्ह्यातील अर्जांची संख्या
= 207178

पेपर चे स्वरूप (District Court Cut-Off Marks 2024)

 1. मराठी व्याकरण = सोपे , 25% अवघड
 2. कम्प्युटर Question = 25% कठीण 25% मिडीयम आणि 50% सोपे
 3. जनरल नॉलेज = 25% सोपे 25% मिडीयम 50% अवघड (प्राचीन भारतावरील प्रश्न )

40 पैकी 25 मार्क बरोबर असलेले विद्यार्थी पात्र ठरतील.

ज्या विद्यार्थ्यांना 40 पैकी 25 किंवा त्याच्याहून अधिक मार्क असतील त्यांनी टायपिंग चा सराव करावा.
25 किंवा त्याहून अधिक मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊ शकते.

District Court Cut-Off Marks 2024

जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक कौशल्य चाचणी, मुलाखत मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट प्रक्रिया :

1. शिपाई – कौशल्य चाचणी, मुलाखत: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा झाल्याच्या नंतर शिपाई या पदासाठी उमेदवारांना कौशल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते.
2. लिपिक – मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट, मुलाखत: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा झाल्याच्या नंतर लिपिक या पदासाठी उमेदवारांना मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट, मुलाखतीसाठी बोलावले जाते.

शिपाई – कौशल्य चाचणी, मुलाखत (District Court Cut-Off Marks 2024)

 1. कौशल्य चाचणी – शिपाई (स्किल टेस्ट) 10 गुण
  वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणी मध्ये पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी म्हणजेच (स्किल टेस्ट) यासाठी बोलवले जाते. कौशल्य चाचणी मध्ये उमेदवारांना इमारतीच्या स्वच्छतेचे काम हे देण्यात येते यामध्ये उमेदवार कशाप्रकारे काम करत आहेत, उमेदवाराचा कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा तसेच काम करण्याची आवड, या सर्व गुणांचे बारकाईने निरीक्षण केले जाते. या चाचणीमध्ये जे उमेदवार पास होतील त्या उमेदवारांची निवड मुलाखती साठी करण्यात येते.
 2. मुलाखत – शिपाई : 10 गुण
  कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट मध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर एका पदासाठी तीन पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.
  या मुलाखतीमध्ये उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाविषयी तसेच व्यवहार ज्ञानाविषयी दैनंदिन जीवनातील प्रश्न विचारले जातात. (उदा. सध्या चालू असलेला तेलाचा, साखरेचा, भाज्यांचा दर इ.)

अशाप्रकारे तीन टप्प्यात एकूण 50 गुणांची शिपाई/हमाल या पदाची परीक्षा घेण्यात येते त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो. आणि पात्र उमेदवारांची निवड यादी प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात येते.

लिपिक – मराठी, इंग्रजी टायपिंग टेस्ट, मुलाखत

 1. मराठी टंकलेखन (Typing Test) – लिपिक (20 गुण)
  उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेमध्ये पास (Qualify) झाल्यानंतर त्यांना टंकलेखन परीक्षेकरिता बोलावण्यात येते. मराठी टंकलेखन परीक्षेमध्ये परीक्षार्थींना मराठी भाषेतील 300 शब्दांचा उतारा देण्यात येतो तो उतारा पाहून 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये संगणकावर विद्यार्थ्यांना तो उतारा Type करायचा असतो . टंकलेखनाच्या (Typing) परीक्षेमध्ये उमेदवार Backspace या बटणाचा उपयोग करू शकत नाही.
 2. इंग्रजी टंकलेखन (English Typing ) लिपिक – (20 गुण) : मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी टंकलेखन या परीक्षा करिता बोलावण्यात येते. इंग्रजी टंकलेखन या परीक्षेमध्ये उमेदवारांना इंग्रजी भाषेमधील 400 शब्दांचा उतारा देण्यात येतो. तो उतारा पाहून 10 मिनिटांच्या कालावधीमध्ये संगणकावर विद्यार्थ्यांना तो उतारा Type करायचा असतो . टंकलेखनाच्या (Typing) परीक्षेमध्ये उमेदवार Backspace या बटणाचा उपयोग करू शकत नाही.
 3. मुलाखत – लिपिक (20 गुण ) : वरीलपैकी दोन्ही चाचणी मध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतर उमेदवारांना एका जागेसाठी तीन उमेदवार या याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात जाते. मुलाखतीमध्ये उमेदवारांना शिक्षणावर आधारित टंकलेखन कौशल्यावर आधारित तसेच संगणकाच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात येतात.

या प्रमाणे तीन टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा + इंग्रजी मराठी टायपिंग आणि मुलाखत याप्रमाणे एकूण 100 गुणांची परीक्षा ही लिपिक पदासाठी घेण्यात येते. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो. आणि पात्र उमेदवारांची निवड यादी /प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात येते.

जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई हमाल कट-ऑफ मार्क्स 2023 कसे तपासायचे?

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार केवळ उच्च न्यायालयाच्या अधिकृत पोर्टलवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक, शिपाई, हमाल कट-ऑफ यादी डाउनलोड करू शकतात. कट ऑफ-लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या चरण-दर-चरण सूचनांचे अनुसरण करा:

पायरी 1: मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

पायरी 2: आता मुख्यपृष्ठावर जिल्हा न्यायालय लिपिक, शिपाई, हमाल कट ऑफ 2023 लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

पायरी 3: श्रेणीनुसार कट-ऑफ गुण स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील.
पायरी 4: PDF fi डाउनलोड किंवा सेव्ह करा

Factors Affecting District Court Clerk, Stenogrepher, Hamal Cut-Off Marks

 • अर्जदारांची संख्या: जर अर्जदारांची संख्या जास्त असेल, तर कट ऑफ गुण देखील जास्त असतील आणि त्याउलट.
 • अडचण पातळी: प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी देखील कट ऑफ गुणांसाठी निर्णायक घटकांपैकी एक आहे.
 • जर प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी जास्त असेल तर त्याचा परिणाम कमी आणि उलट होईल.
 • रिक्त पदांची संख्या: पदासाठीच्या रिक्त पदांमध्ये दरवर्षी चढ-उतार होतात, ज्यामुळे उच्च न्यायालयाच्या लिपिक, शिपाई, हमाल कट ऑफवरही परिणाम होतो